सांगलीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह ऐकला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम

13

सांगली : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २७ सप्टेंबर रोजी सांगली येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम पाहिला व ऐकला.

या उपक्रमाविषयी आपले मत व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशाच्या अखंड प्रगतीची आणि विकासाची दिशा, जनसेवेचा दृढ संकल्प आणि देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींचे अनुभव यांमुळे ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नेहमीच समाजाला एक नवी ऊर्जा आणि कार्य करण्याची मोठी प्रेरणा मिळते.

मन कि बात मध्ये आज मोदीजी म्हणाले, २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने घेतलेल्या ऐतिहासिक ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या कामगिरीला १० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख त्यांनी सुरुवातीलाच केला. ते म्हणाले, “आजचा नवा भारत दहशतवाद अजिबात सहन करत नाही आणि देशाला त्रास देणाऱ्यांना चोख उत्तर देण्याची ताकद आपल्या सैन्यात आहे. समाजात चाललेल्या चांगल्या कामांच्या गोष्टी ‘मन की बात’च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आगामी सण आणि उत्सवांसाठी सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी राज्याचे माजी मंत्री व मिरजेचे आमदार डॉ. सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रकाश ढंग यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.