हॅलो बिचुकले, तुम्ही खचु नका, जनता तुमच्या पाठिशी – चाहता

12

हॅलो बिचुकले ,

मी बोलतोय…
बिगबॉस चा प्रेक्षक, मी साधारण कुटुंबातील आहे . अगदी आपल्या सारखाच. आवडत बिगबाॅस बघणं म्हणून बघतो. तुम्हाला पहील्या दिवशी बघीतल. आणी खुप हसलो तुमच्या वर ! की तुम्ही कसे वागत आहात हे सर्व बघुन , पण हे माञ विसरलो की सर्वसामान्य मानुस ज्यांना टिव्हीवर बघतो ते प्रत्यक्षात आपल्या सोबत राहनार,खानार,पिनार,उठणार,बसनार हे सर्व अचानक सामान्याच्या सोबत घडल तर तो असाच रिऍक्ट होनार! तुमच्या भाषेत मातिचा गंध आहे तिच्यात प्रेम आहे. ठोकणे ह्या साध्या शब्दा बद्दल हे सर्व येवढा तांडव करत असतील तर यापेक्षाही घाण ते बोल्लेत , तुमची आई सुद्धा काढायला यांनी मागेपुढे बघीतल नाही. सन्मानाच्या गोष्टी हे करतायत ज्यांना दुसऱ्याचा सन्मान कसा करावा हे कळत नाही, तुमच काहिच चुकल नाही, तुम्ही गेम खेळत आहात . तुम्ही ज्यांच भल करायला गेलेत त्यांनिच तुम्हाला वारंवार तोंडावर पाडलत ! पण तुम्ही खचु नका ! जनता तुमच्या पाठिशी आहे. येवढ्या कणखर माणसाला यांनी रडवल, तुमच्या एका एका आसवाची शपत घेवुन सांगतो. ह्या अहंकारांच्या पुतळ्यांना जनता धडा शिकवणार. तुम्ही माणूस  म्हणुन ग्रेट आहात.

तुमच्यात खुप सहनशिलता आणि नम्रता आहे. आणि हळव्या मनाचा नेता खरच खुप भावनिक आहात . एक एक करुन सगळ्यांचे खरे चेहरे तुम्ही समोर आणलेत.ज्या जनतेच्या भरोशावर हे येवढे फडफड करतात त्या जणतेच्या साठी यांच्या मनात काय आहे हे तुम्ही बाहेर आणलत. आता यांचा माज आणी खोटी प्रतिष्ठा ही जनता उतरवणार. विठु माउली आहे. ति बघती आहे सगळ! तुम्ही जिंकले आहात. तुम्ही एक आदराच स्थान  मिळवलत प्रत्येकाच्या मनात ! आणी आता सावरा स्वताला अख्ख बिगबाॅस च घर जरी विरोधात गेल तरी चालेल , पण तुम्ही माघार घ्यायची नाही! साताराच नाही संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या साथिला आहे. आता रडायच नाही लढायच. तुम्हाला रडतांना बघुन तुमच्याशी बोलण्याची ईच्छा झाली. काही चुकल असेल तर माफ करा आता फोन ठेवतोय… ☎

तुमचा च्याहता 

बिगबॉस मराठी मध्ये सर्वांचे सॉफ्ट टार्गेट झालेले अभिजीत बिचुकले यांच्या चाहत्याने त्यांना सोशल पोस्ट च्या माध्यमातून आधार देण्याचा प्रयत्न केला आहे या पोस्ट मध्ये ते बिचूकलेंसोबत फोनच्या माध्यमातून  संवाद साधत आहेत.