बिगबॉस: खलनायकाने धरला लावणीचा ठेका

2

गैर, हापूस ,मी शिवाजीजराजे भोसले बोलतोय, अर्जुन  यासारख्या अनेक मराठी चित्रपटातून खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी  बिग बॉसच्या आदेशानुसार लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची वेशभूषा करत लावणीच्या तालावर थिरकायला सुरुवात केली. या रावजी … कारभारी दमानं.. लावण्यांवरचे  विद्याधर जोशी आणि सुरेख पुणेकर यांचे सादरीकरण पाहून बिगबॉस मधील अन्य कलाकारांनी दोघांना साष्टांग नमस्कार केला. 


नुकताच सुरु झालेल्या  बिग बॉस सीजन २ मध्ये स्वतःला नॉमिनेट होण्यापासून वाचवण्यासाठी दिला गेलेला  टास्क पूर्ण करण्यासाठी विद्याधर यांनी हा स्त्रीवेष परिधान केला.