‘ग्लो वॉर्म इन अ जंगल’ लघुपटाला पुरस्कार

1

 पुण्यातील ज्येष्ठ  वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांच्या जीवनपद्धतीवर निर्मित केलेल्या ‘ग्लो वॉर्म इन अ जंगल’ या  माहितीपटासाठी रमणा दुम्पाला (दिग्दर्शन विभाग)  तर सार्थक भासीन याने दिग्दर्शित केलेल्या  ‘एकांत’ लघुपटाच्या कला दिग्दर्शनासाठी नीरज सिंग अशा  दोघांनी विशेष उल्लेखनीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. वीज न वापरणे हा डॉ. हेमा साने यांच्या जीवनपद्धतीचा एक भाग आहे. त्याला कुठेही धक्का लागू नये, यासाठी संपूर्ण माहितीपटाचे विनालाईट शूटिंग करण्यात आले. निसर्गाच्या आणि पशुपक्ष्यांच्या सान्निध्यात आपले लिखाण आणि वाचन करण्याचे काम त्या करतात. हा माहितीपट पूर्ण झाल्यानंतर त्यांना दाखविण्यात आला. त्यांना खूप आनंद झाला आणि कामाचे चीज झाल्यासारखे वाटले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त कळविल्यानंतर त्यांनी कौतुक केले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये एफटीआयआयच्या या दोन विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार  मिळाला आहे. रमणा दुम्पाला हा मूळचा हैदराबादचा आहे.आणि  तो एफटीआयआयच्या दिग्दर्शन विभागाचा विद्यार्थी आहे.