कोथरूड येथील अठरा वर्षांवरील मुली व महिलांना मोफत ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा दाखवण्याचा चंद्रकांत पाटीलांचा संकल्प

97

पुणे : नुकताच प्रदर्शित झालेला ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा चर्चेचा विषय ठरत आहे. लव्ह जिहाद विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतांना अनेक वादांना देखील यामुळे तोंड फुटलें आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असतांना काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील अठरा वर्षावरील मुली आणि महिलांना हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हि संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाच्या माध्यमातून संवेदनशील व अतिशय गंभीर विषय मांडण्यात आला असून या सिनेमावर चर्चा व्हावी, संवाद व्हावा; तसेच महिलांनी विशेष करुन तरुणींनी एकत्र येऊन हा सिनेमा पहावा आणि या संवेदनशील विषयावर त्यांच्यामध्ये जागृती व्हावी, यासाठी कोथरूड येथील अठरा वर्षांवरील मुली व महिलांना मोफत हा सिनेमा दाखवण्याचा संकल्प केला असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच हा सिनेमा नक्की पहा आणि आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे गांभीर्याने बघा, ही विनंती असे आवाहन देखील पाटील यांनी केलं आहे.

तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्यात आली असतांना दुसरीकडे कोची शहरामधील अनेक थिएटर मालकांनी मोठा निर्णय घेत चित्रपटाचे सर्व शो रद्द केले आहेत. मात्र, असे असताना देखील द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर तूफान अशी कामगिरी करत आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.द केरळ स्टोरी चित्रपटावर काही राज्यांमध्ये बंदी घातली गेलीये तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.