पनवेल : 18 महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात
पनवेल : दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आणि होणारे मृत्यू संख्या वाढत असताना, एक आनंदाची बातमी समोर आली आहे, जासई,उरण येथील 18 महिन्याचे बाळ कोरोनावर मात केली आहे. आज एम.जी.एम.,कामोठे रुग्णालयातून याबाळाला आई समवेत घरी सोडण्यात आले. पनवेल महानगरपालिकेचे मा.आयुक्त, प्रांताधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे उप आयुक्त तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.