साडे सहाशे विक्रम रिक्षा चालकांच्या मदतीला ‘शिवसेनेचा वाघ’

13

शिवसेनेचे महाड विधानसभामतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते महाड पोलादपूर तालुक्यातील सुमारे साडे सहाशे मिनिडोर रिक्षा चालकांना आज महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धान्य वाटप केले.

त्या वेळी उपस्थित उप जिल्हा प्रमुख पद्माकर मोरे,संपर्क प्रमुख विजय आपा सावंत,तालुका प्रमुख सुरेश महाडिक, नगरपालिका विरोधी पक्ष नेते,बंटी पोटफोडे, शहर प्रमुख नितीनजी पावले, सिद्धेश पाटेकर,महाड पोलादपूर रिक्षा तालुका अध्यक्ष शेखर राखाडे,इत्यादी उपस्थित होते, या वेळी रिक्षा संघटनेच्या वतीने आमदार साहेबांचे आभार मानले.

आपला माणूस आपला आमदार म्हणून प्रचलित आमदार भरत गोगावले स्वतः कोरोना संकटामध्ये गावो-गावी जाऊन उपाययोजनांची पाहणी करत आहेत आणि जनसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत .