कोरोना अपडेट : महाडमध्ये आणखी एक रुग्ण, बिरवाडी करोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित

15 795

अलिबाग, जि. रायगड, दि.30 (जिमाका) : जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडी येथील साळवी कॉम्प्लेक्स येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेले प्रभाग क्रमांक 5 मधील गणू सावंत मार्ग ते मधले आवाड येथील ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्याचा दक्षिणेकडील भाग मधला आवाड टाकी कोंड, ज्ञानेश्वर मंदिराकडून अंतर्गत रस्ता ते जुना बैठक हॉलपर्यंत, जुना बैठक हॉल ते गजानन नथू सोलम मार्ग येथील महाड-मांघरुण मुख्य रस्ता हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. 
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.