मेधा कुलकर्णींनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, विधवा महिलांना दरमहा ५००० वेतन देण्यासाठी राज्यसरकारला सूचना करण्याची मागणी

295
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नुकतीच भारतीय जनता महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोथरूडमधून  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच उमेदवारी मिळाल्यामुळे डावललेल्या मेधाताईंचे भाजप कडून राष्ट्रीय पातळीवर पुनर्वसन करण्यात आले.
उच्च शिक्षित, उत्तम संघटन कौशल्य आणि अभ्यासू म्हणून प्रचलित असणाऱ्या मेधा कुलकर्णी  या पुन्हा एकदा चर्चेत आपल्या आहेत.  राष्ट्रीय स्तरावर पुनर्वसन झाल्यानंतर पक्ष संघटना वाढीसाठी  झपाट्याने कामाला लागलेल्या मेधा कुलकर्णी यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, इतकंच नव्हे तर मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधानांना राखी देखील बांधली. या भेटी संदर्भात त्यांनी ट्विटकरत माहिती दिली आहे.

पंतप्रधान यांच्या सोबत झालेल्या भेटीत त्यांनी कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एकरकमी ५ लाख ₹ अथवा दरमहा ५००० ₹ वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती पंतप्रधानांकडे केली. यासोबतच पुण्यातील लसीकरण, शनिवार वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी आदी विषय देखिल त्यांनी पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मांडले असल्याचे सांगितले असून मोदीजींनी या सर्व मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.