….तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा, नरीमन पॉईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो – नितीन गडकरी

4

 

पुणे: पुण्यात आज सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं  भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांच्या हस्ते झालं. यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात सुरु असलेल्या विविध विकासकामांची यादीच वाचून दाखवली. मी दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

उड्डाणपुलाचं उद्घाटन करताना नितीन गडकरी म्हणाले, मुंबईतील वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वात या पुलाची जबाबदारी मला मिळाली. मला खूप शिकायला मिळालं. सी लिंक वसई -विरारपर्यंत न्यायचा माझी इच्छा होती. पण महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीमुळे झालं नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

आता मी मुंबई-दिल्ली हायवे बांधतोय, 170 किमी स्पीडने गाडी चालवली, पोटातलं पाणी हललं नाही. 70 टक्के काम पूर्ण झालंय, महाराष्ट्रातील काम राहिलं आहे, जेएनपीटीपर्यंत हा रस्ता नेणार आहे. अजितदादा आपण मागणी केली वसई -विरारपासून वरळीपर्यंत हा रस्ता जोडला तर मी नरीमन पॉईंटवरुन दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल. माझं वरळी- बांद्रा सी लिंकशी इमोशनल नातं, माझ्या खात्याकडे खूप पैसे आहेत, दिल्लीला नरीमन पॉईंटशी जोडून देण्याचं काम मी नक्की करेन, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून प्रस्ताव तयार करा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.

पुण्यात येताना दुख होतं, पुण्यातील हवा शुद्ध होती, माझी बहीण पुण्याची, स्वारगेटजवळ बहिण राहत होती, पर्वतीवर जाऊन खायचं, आताचे पुणे प्रदूषित झालं, जल,वायू आणि ध्वनी प्रदूषण याबाबत इंटरनॅशनल बेंचमार्क आहेत, त्याचं पालन करु. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सगळ्या मंत्र्यांचे हॉर्न बंद केले, लाल दिवे काढले, मला ध्वनी प्रदूषणाचा त्रास लक्षात आला. मी ऑर्डर काढणार आहे, जर्मन व्हायलिनवादक होता, त्याने आकाशवाणीची ट्यून तयार केली होती, मी ती ट्यून शोधली, आता अ‍ॅम्ब्युलन्सवर ती लावणार, कानाला चांगलं वाटतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.