केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण; ट्विट करुन दिली माहिती

मुंबई: देशासह राज्यात कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरतो आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जास्त प्रमाणात नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होत आहेत. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी स्वतःचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भाजप मुख्यालयातील 42 कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. या मुख्यालयात भाजपच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात येते. दिल्लीमध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भाजपमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी स्वतः ट्विट करुन कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे जे संपर्कात आले आहेत त्यांना काळजी घेण्याचे आणि कोरोना चाचणी करण्याचे आवाहन नितीन गडकरींनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले की, सौम्य लक्षण आढळल्यामुळे कोरोनाची चाचणी केली होती. चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नियमानुसार स्वतःला होम क्वारंटाईन केलं आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी आणि स्वतःला आयसोलेट करावे असे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.