नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव… सुधाकर अडबाले यांचा दणदणीत विजय

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे. या चुरशीच्या निवडणुकीत आडबाले  यांनी भाजपच्या नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. पहिली फेरीतच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

निवडणुकीच्या विजयावर अडबाले यांनी म्हटले कि, दोन वर्षांपासून मी मतदारसंघातील शिक्षकांच्या संपर्कात होतो. जुन्या पेन्शन योजनेसाठी मोर्चेही काढले. महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्याने विजयी होईल, अशी अपेक्षा होतीच. आता पुढच्या काळात राजकीय पक्ष बाजूला ठेवून शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. नागपूरच्या जागेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
अडबाले यांनी म्हटले कि, भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहजिल्ह्यात हि निवडणूक असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महाविकास आघाडीने आडबाले यांना पाठिंबा दिला असल्यामुळे  त्यांचा विजय झाला.
सुधाकर अडबाले हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने त्यांची उमेदवारी संघटनेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन अनेक महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. त्याना त्यांच्या संघटनेतून कुठेच विरोध नव्हता.