‘संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट’ कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप

41

मुंबई: मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणी NCB ने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. पण याचप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत खळबळजनक आरोप करत NCB च्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी असं म्हटलं आहे की, एकूण परिस्थिती पाहता ही संपूर्ण कारवाईच बनावट आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत आता NCB ने खुलासा करणं गरजेचं आहे.

“एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?” असंही नवाब मलिक म्हणाले.

“काही फोटो एनसीबीने जारी केले आहेत, त्यात काही अंमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आले आहेत, हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे आहेत. के पी गोसावी यांचा‌ झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, मनिष भानुशाली यांचा संबंध काय? खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली? त्यांना काही अधिकार आहेत का?” अशा प्रश्नांची सरबत्ती नवाब मलिक यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.