“मी दुबईला चाललोय” सरकारी यंत्रणांनी माझ्यावर नजर ठेवावी – नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री गेल्या दीड महिन्यापासून प्रचंड चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप आहेत. नवाब मलिक हे दुबई दौऱ्यावर निघाले आहेत. मलिकांनी स्वतःच्या दुबई दौऱ्याची माहिती देत माझ्यावर सरकारी यंत्रणांनी नजर ठेवावी असे ट्विट करुन सांगितले आहे.
दरम्यान नवाब मलिक यांनी असे का सांगितले असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. राजकीय वर्तुळात मलिकांच्या ट्विटवर तर्क वितर्क लढवण्यात येत आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावरुन अनेक आरोप केले आहेत. यामुळे नवाब मलिकांनी आपण बाहेर जात असून आपल्यावर नजर ठेवावी असे तर सांगितले नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विटमुळे सर्वांमध्ये एकच उत्सुकता निर्माण झाली आहे. ती म्हणजे नवाब मलिक नक्की कशासाठी दुबई दौरा करत आहेत. तसेच नवाब मलिकांच्या दौऱ्यामागे कारण काय? नवाब मलिक यांनी सगळ्यांना आपण दुबई दौऱ्यावर जात असल्याची माहिती दिली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कोरोना काळात दुबईचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये वानखेडेंनी वसुली केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. दुबई दौऱ्यामुळे आपल्यावरही आरोप करण्यात येतील म्हणून नवाब मलिक यांनी दौऱ्याची माहिती दिली असावी.