नवाब मलिकांचा मोठा खुलासा; जातप्रमाणपत्रानंतर आता वानखेडेच पहिल्या लग्नाचे सर्टिफिकेट केले शेअर

मुंबई: नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या जातप्रमाणपत्रानंतर आता समीर दाऊद वानखेडे उल्लेख असलेला पहिल्या लग्नाचा निकाह नामा  शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी शबाना कुरेशी यांच्याशी विवाह केल्याचा दावा आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांनी आपण जन्मतः हिंदू असल्याचं म्हणत नवाब मलिकांच्या आरोपांना फेटाळून लावलं होतं. 2016 साली त्यांनी पहिल्या पत्नीपासून वेगळं होतं मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत 2017 साली विवाह केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट ट्विटर वर शेअर केले आहे. तसेच या लग्नावेळी साक्षीदार म्हणून समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन यांचे पती अजीज खान हे होते असा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचे प्रमाणपत्र ट्विटर शेअर केलं होतं.

आम्ही हिंदूच

मी आणि माझे पती समीर वानखेडे जन्माने हिंदूच आहोत. आम्हाला सर्व धर्मांविषयी आदर आहे. आम्ही आमचा धर्म बदलला नाही. समीरचे वडीलही हिंदूच आहेत. तसंच माझ्या सासूबाई मुस्लिम होत्या. त्या आता हयात नाहीत. समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत झालं होतं. समीर आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा डिव्होर्स 2016 मध्ये झाला. मी आणि समीरने 2017 मध्ये लग्न केलं. या आशयाचं ट्विट क्रांती रेडकरने केलं आहे.

Read Also :