पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: लेफ्टनंट कर्नल महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. आज सकाळी वानवडी परिसरात ही घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव रश्मी मिश्रा (वय ४३) असे असून त्या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समध्ये मूळ पोस्टिंगला आहेत. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये ६ महिन्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांनी ३ महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण केले होते. त्यांचे पती देखील कर्नल आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी आस्थापनेच्या आवारात तिच्या अधिकृत निवासस्थानी मृतावस्थेत आढळली होती, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. वानवडी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनाक्रमाविषयी लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने चौकशी केली जाईल.