मोठी बातमी! गुजरातमधून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त

7

मुंबई: महाराष्ट्रामध्ये ड्रग्जवरुन रणकंद सुरु असतानाच गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. ज्यात हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. यापूर्वी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्जची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्थानिक गुन्हे शाखेला एक व्यक्ती ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वांकानेर रस्त्यावर सापळा रचत अटक करण्यात आलं. या आरोपीकडून दोन बॅग जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बॅगमध्ये 15 किलो तर दुसऱ्या बॅगमध्ये 45 किलो ड्रग्ज होतं.

गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जवळपास १६ किलो हेरॉईन जप्त केलं आहे. हेरॉईनसोबत ६६ किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आलं आहे. याची किंमत जवळपास ३५० कोटी रुपये असल्याचं समजत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्जची तस्करी पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे होत होती. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत ड्रग्ज जप्त केलं.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.