पुण्यात कबड्डीपटू अल्पवयीन मुलीची हत्या; दोन आरोपींना अटक

1

पुणे पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. तिच्यावर कोयत्याने वार करून तीन जणांनी निर्घृण हत्या केली आहे. माहितीनुसार याप्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्याचा अजूनही शोध सुरू आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

अल्पवयीन कबड्डीपटू विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपीसह इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी तरुण हा अल्पवयीन मुलीचा नातेवाईक असून तिच्या घरी राहत होता. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करणार, असं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवीत शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईक होता.  आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी मुख्य आऱोपी आणि इतर दोघे तिच्याजवळ आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली.

ज्या व्यक्तीने मुलीचा खून केला त्याच्याकडे कोयता तसेच पिस्तुलदेखील होते. मात्र, खून करताना रागाच्या भरात त्याने कोयत्याचा उपयोग केला. तर खून केल्यानंतर पिस्तूल घटनास्थळीच फेकून देत पळ काढला. दरम्यान, या अत्यंत भीषण खुनामुळे बिबवेवाडी तसेच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.