कुर्ल्यात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन हत्या; लिफ्टजवळ आढळला मृतदेह

4

मुंबई: मुंबई पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरात असलेल्या एचडीआयले कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीवर बलात्कार करुन नंतर तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बंद इमारतीच्या टेरेसवर लिफ्टच्या बाजूला तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. तरूणीची ओळख अद्याप पटली नसून पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला आहे.

कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाउंडमध्ये या तरुणीचा मृतदेह सापडला. एका बंद पडलेल्या इमारतीच्या टेरेसवर मृतदेह सापडल्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह राजावडी रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का, याची चौकशी पोलीस करत आहेत. काही तरुण एचडीआयएल कंपाऊंडमधील बंद असलेल्या इमारतीवर इन्स्टाग्रामसाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी टेरेसवर तरुणीचा मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.