‘अश्विनसारख्या खेळाडूला मी कधीही माझ्या संघात घेणार नाही’

मुंबई: स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा खलनायक ठरला. अश्विनच्या मोठ्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीची संधी गमावली. दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात 7 धावा वाचवायच्या होत्या, पण आर अश्विन असे करण्यात अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या दोन चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती आणि रविचंद्रन अश्विनकडे चेंडू होता.
या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर अश्विन हॅटट्रिकवर होता, पण राहुल त्रिपाठीने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून दिल्लीचे स्वप्न भंग केले. भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे की, तो रविचंद्रन अश्विन सारख्या खेळाडूला आपल्या टी – 20 संघात कधीही ठेवणार नाही आणि त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती किंवा सुनील नारायणच्या रूपात विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंना संधी देईल. आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजी करणाऱ्या आर. अश्विनने सामना हातचा गमावला.
संजय मांजरेकर म्हणाले, ‘आपण अश्विनबद्दल बरंच बोललो. अश्विन टी -20 सामन्यांमध्ये कोणत्याही संघासाठी तितका प्रभावी राहिलेला नाही. जर तुम्ही अश्विनला बदलू इच्छित असाल तर असे काही होईल असे मला वाटत नाही, कारण तो गेल्या 5-7 वर्षांपासून असाच आहे. मला माहिती आहे की कसोटी सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म कौतुकास्पद आहे. मात्र त्याला इंग्लंडमध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही हे पाहून वाईट वाटले. संजय मांजरेकर म्हणाले, ‘रविचंद्रन अश्विन टी -20 क्रिकेटमध्ये तितक्या प्रभावीपणे विकेट घेत नाही आणि कोणतीही फ्रँचायझी त्याला फक्त धावा रोखण्यासाठी संघात ठेवू इच्छित नसणार.