विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव

मुंबई: आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आयपीएल जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. त्याचबरोबर, विराट कोहली संघाचा कर्णधार असताना संघाचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण आयपीएल 2021 हा कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा हंगाम होता. कोलकाता नाईट रायडर्सने शारजा येथे प्लेऑफच्या एलिमिनेटर सामन्यात बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव करत दुसऱ्या पात्रता फेरीत स्थान मिळवले. बेंगळुरूलाही हा सामना जिंकता आला असता पण त्यांनी चूक केली. पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीनेही ती चूक सांगितली.
या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शारजाच्या खडतर खेळपट्टीवर त्यांच फलंदाज गडगडले आणि कसे तरी त्यांनी 20 षटकांत 6 गडी गमावून 138 धावा केल्या. अर्थात, हा स्कोअर छोटा दिसत होता पण सगळे साक्षीदार आहेत की या संपूर्ण हंगामात शारजाच्या खेळपट्टीवर, अगदी लहान स्कोअर सुद्धा मोठ्या स्कोअरसारखे दिसला आहे. अनेक सामन्यात छोटा स्कोअर असूनही अगदी शेवटच्या षटकात किंवा शेवटच्या चेंडूवर पोहचले, त्यामुळे सामना अजूनही RCB च्या हातातून सुटलेला नव्हता.
उत्तर देण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने 11 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर व्यंकटेश अय्यरची विकेट काढली होती आणि आता कोलकाता नाईट रायडर्सची धावसंख्या 3 गडी बाद 79 होती. तरीही त्यांना 54 चेंडूत 60 धावांची गरज होती. फलंदाजांना या खेळपट्टीवर मोठे फटके मारणे कठीण वाटत होते, त्यामुळे कोलकाताला विजयासाठी खूप संघर्ष करावा लागेल हे निश्चित वाटत होते.