धोनीच्या चेन्नईने चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव; चेन्नईने २७ धावांनी जिंकली

6

मुंबई: महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने चौथ्यांदा आयपीएल जिंकली. फायनल मॅच चेन्नईने २७ धावांनी जिंकली. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सला भोवला. चेन्नईने २० ओव्हरमध्ये ३ बाद १९२ धावा केल्या. कोलकाताला हे आव्हान पेलवले नाही, त्यांना २० ओव्हरमध्ये ९ बाद १६५ धावा एवढीच मजल मारणे जमले. या मॅचमध्ये ५९ बॉलमध्ये ७ फोर आणि ३ सिक्स मारत ८६ धावा करणारा चेन्नईचा फाफ डू प्लेसिस मॅन ऑफ द मॅच झाला.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ३२, फाफ डू प्लेसिसने ८६, रॉबिन उथप्पाने ३१, मोईन अलीने नाबाद ३७ धावा केल्या. कोलकाताच्या सुनिल नरेनने २ तर शिवम मावीने १ विकेट घेतली. कोलकाताकडून शुभमन गिलने ५१, वेंकटेश अय्यरने ५०, नितीश राणाने शून्य, सुनिल नरेनने २, इऑइन मॉर्गनने ४, दिनेश कार्तिकने ९, शाकीब अल हसनने शून्य, राहुल त्रिपाठीने २, लॉकी फर्ग्युसनने नाबाद १८, शिवम मावीने २०, वरुण चक्रवर्तीने नाबाद शून्य धावा केल्या. चेन्नईच्या शार्दुल ठाकूरने ३, जोश हेझलवूड आणि रविंद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी २, ड्वेन ब्राव्हो आणि दीपक चहर या दोघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

चेन्नईची आयपीएलमधील आतापर्यंतची कामगिरी

२००८- उपविजेते

२००९- चौथ्या स्थानी

२०१०- विजेते (पहिल्यांदा आयपीएल जिंकली)

२०११- विजेते (दुसऱ्यांदा आयपीएल जिंकली)

२०१२- उपविजेते

२०१३- उपविजेते

२०१४- तिसऱ्या स्थानी

२०१५- उपविजेते

२०१८- विजेते (तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली)

२०१९- उपविजेते

२०२०- सातव्या स्थानी

२०२१- विजेते* (चौथ्यांदा आयपीएल जिंकली)

Get real time updates directly on you device, subscribe now.