आज होणार अंतिम सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता, कोण मारणार बाजी?

मुंबई: आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची अखेर आज दुबईत होणार आहे. दोन टप्प्यांमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी लढणार आहेत. त्यामुळे दुबईत आज कोणता संघ विजयाचं सोनं लुटतो हे पाहणं क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाचं ठरणार आहे.

या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघानी कसून तयारी केली असून नेमका विजेता कोण? या उत्तराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आयपीएल 2021 चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.

याआधी चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ २०१२ सालच्या अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. यावेळी गौतम गंभीरच्या संघाने चेन्नईवर मात करत पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे आपल्या या कामगिरीची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न ओएन मॉर्गनचा KKR संघ करणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे विजेतेपदासाठी कोणाचं पारडं जड आहे यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता लागली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!