मुंबईतील अविघ्न पार्क टॉवरमध्ये भीषण आग, 19 व्या मजल्यावर हात सुटून रहिवासी थेट खाली कोसळला

मुंबई: मुंबईच्या करी रोड परीसरातील माधव पालव मार्गावरील अविघ्न पार्क या इमारतीला आग लागली आहे. सकाळी ११ वाजून ५१ मिनीटांनी आग लागल्याचा प्रकार समोर आला. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी तो उंचावरुन खाली पडल्याची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

६० मजल्यांच्या या टॉवरला लागलेल्या आगीमुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. १९ व्या मजल्यावरुन धुराचे काळे लोट बाहेर पडत आहेत. आगीचं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.

अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की,  अग्निशमन दलाचे लोक शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारीचा हात खाली निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. यातून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतले लोक सांगतायत त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किगमध्ये ठेवलं नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसतायत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

अविघ्न पार्कमधील 19 मजल्यावर आग आगली. मी रहायला 20 व्या मजल्यावर आहे. मला जसंही आगीचे लोट दिसले, तसंही मी लगोलग खाली उतरले. इतरांनाही आगीची माहिती दिली. आगीची भीषणता खूपच होती. माझ्या माहितीप्रमाणे 19 व्या मजल्यावर कुठेतरी फर्निकरचं काम सुरु होती. त्यावेळी आग लागली. परंतु बिल्डिंगमध्ये ऑटोमॅटिक फायर सिस्टम आहे. रहिवासी इमारत असल्याने नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पूर्ण झालेलं हे. नागरिक अडकल्याची भीती राहिलेली नाही

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!