विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी, केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर; दिलीप वळसे पाटलांची भाजपवर टीका
नागरपूर: राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर केंद्र सरकारकडून सध्या ईडी, आयकर, एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून कारवाई केली जात आहे. केंद्र सरकार कडून विरोधकाना विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी एनसीबीसारख्या तपास यंत्रणांचा वापर केली जात असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे कधी होत नव्हतं, अशी टीका केली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या चौकशीवरून केंद्र सरकावर टीका केली. ते म्हणाले की, केन्द्र सरकार तपास यंत्रणानाचा वापर अशा पद्धतीने करेल याबाबात कधी विचारही केला नव्हता. अशा प्रकारचे काम यापूर्वी कधी झालेही नव्हते, तसेच पाहिलेही नव्हते. मात्र, तसे आज घडत आहे.
नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोपांच्या फैरी झाडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यावर बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “नवाब मलिक यांची NCB विभागा संदर्भात तक्रार आहे असे दिसते. त्यामुळे एनसीबीविरोधात ते सातत्याने आवाज उठवत आहेत, त्याबद्दल बोलत आहेत”.