राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपाचे तुम्हीही सदस्य व्हा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
मुंबई : भारतीय जनता पार्टीकडून सध्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील पक्षाचे प्राथमिक सदस्यत व स्वीकारले. “देशहित सर्वोपरि” हेच भाजपाचे ब्रीद आहे. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या भाजपाचे तुम्हीही सदस्य व्हा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, समाजातील सर्व घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व परिवर्तन सुरु आहे. परिवर्तनाच्या त्या प्रक्रियेचा भाग व्हा. चला सर्व मिळून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बनवूया आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या जादुई नेतृत्वाखाली नव्या भारताच्या उद्याचे साक्षीदार होऊ या. जगातील सर्वात मोठ्या तसेच देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे जे प्राथमिक सदस्य झाले नसतील त्यांनी 8800002024 खालील लिंक वर जाऊन सदस्यत्व स्वीकारावे अशी विनंती पाटील यांनी केली. https://narendramodi.in/bjpsadasyata2024/INGRMC रजिस्ट्रेशन करताना आपण माझा INGRMC हा रेफ्रल कोड वापरावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
राज्यात या अभियानात 1 कोटी 51 लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प पक्षातर्फे करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपाच्या देशव्यापी सदस्यता अभियानाला प्रारंभ झाला. ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत्या त्या राज्यात निवडणुकीनंतर सदस्यता अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यात सदस्यता नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सदस्यता नोंदणी अभियानाला नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रारंभ झाला या अभियानात 5 जानेवारी 2025 रोजी राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष सहभागी होणार आहेत.