पुण्यात दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळीबाराचा थरार, दोघांचा मृत्यू

4

पुणे: पुणे जिल्ह्यातील पुन्हा एकादा कायदा सुव्यस्थेवर प्रश्न चिन्हे निर्माण झाला आहे. काल महाराष्ट्र् बँकेवर दरोडा पडला आणि आज पुन्हा भर दिवसा भररस्त्यात गोळीबाराचा थरार बघायला मिळाला आहे. दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण त्यांचा रुगणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेने मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे.

अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या एका टोळीमध्ये ही फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. संतोष जगताप याच्यावर देखील फायरिंग झाली आहे. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नेमकं काय घडलं? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळीयुद्ध भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगतापवर पूर्वीच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याचे समजते.

संबंधित घटना ही पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. ऊरळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराचा हा भयानक थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे अजिबात भय नसल्याचं हे पुन्हा एकदा समोर आलं होतं.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भर चौकात गोळीबाराची घटना घडत नाही तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवला असं म्हणता येणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. पण आता पुण्यात थेट भर चौकात गोळीबाराच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आतातरी पोलीस यंत्रणा जागी होईल, अशी आशा सर्वसामान्यांकडून बाळगली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.