काँग्रेसला मोठा फटका; पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजप 14 जागेवर विजयी

3

पुणे: पीएमआरडीएच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपने 30 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागवला आहे. मात्र, काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

पीएमआरडीएच्या पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी बुधवारी मतदान झाले होते. एकूण 30 जागांसाठी हे मतदान झाले होते. मात्र, महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने या निवडणुकीत काँग्रेस एकटी पडली. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तिसरी आघाडी झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. तर आघाडीचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून आलं आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने बंडखोरी करून उमेदवार दिला होता. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपने 14 जागा पटकावल्या आहेत. तर राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेलाही यश आलं आहे. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर एकच जल्लोष केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेटवर जोरदार घोषणाबाजी करत एकमेकांचं अभिनंद करून विजयाचा गुलाल उधळला.

पीएमआरडीएमध्ये शिवसेनेकडे पुण्यात 10 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 19 मते होती. तर भाजपकडे 172 मते होती. भाजपने या निवडणुकीत 14 उमेदवार दिले होते. त्यांचे हे सर्व उमेदवार विजयी झाले असून भाजपच्या बाजूने शंभर टक्के निकाल आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडे 10 मते होती. त्यामुळे अतिरिक्त मतांचा कोटा भरून काढणे काँग्रेसला कठिण गेले. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रं आल्याने काँग्रेस या निवडणुकीत एकटे पडल्याचे चित्रं दिसत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही 8 उमेदवार होते. त्यामुळे राष्ट्रवादीनेही या आठही जागा पटकावल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.