“…तर मी माझा पुरस्कार परत करेन”; कंगना म्हणाली…

23

मुंबई: स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. कंगना राणौतला देण्यात आलेला पद्मश्री परत घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. यावर आता कंगनानं स्पष्टीकरण दिलं आहे. १९४७ मध्ये नेमकं काय झालं ते मला सांगितल्यास पद्मश्री पुरस्कार परत करेन, असं कंगनानं म्हटलं आहे.

मी माझ्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं आहे की स्वातंत्र्यासाठी पहिलं संघटित युद्ध 1857 ला झाले. ही बाब मलाही माहित आहे, मात्र मला 1947 ला कोणती लढाई झाली ते माहित नाही. जर मला कुणी या प्रकरणी माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करते, माफीही मागेन असं आव्हान आता कंगनाने दिलं आहे. यासंदर्भात कंगनाने आता इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने हे प्रश्न विचारले आहेत.

मी शहीद राणी लक्ष्मीबाईसारख्या सिनेमात काम केलं आहे. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरेच संशोधन झालं आहे. राष्ट्रवादासोबत दक्षिण पंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसं झालं? महात्मा गांधी सिंग यांना मरू का दिलं? सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली? त्यांना गांधींजींचा पाठिंबा कधीच का मिळाला नाही? इंग्रजांनी विभाजन का केलं? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत का होते? मला या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती कुणी देईल का?

‘मी जी मुलाखत दिली त्यामध्ये मी कोणत्याही शहिदाचा किंवा कोणत्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे हे जरी मला कुणी दाखवलं तरीही मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन. मुलाखतीच्या छोट्या छोट्या क्लिप व्हायर करण्यात काहीही अर्थ नाही. माझं संपूर्ण म्हणणं दाखवा आणि पुढे येऊन सगळं सत्य सांगा, मी सगळ्या परिणामांना सामोरी जायला तयार आहे’ असंही कंगनाने आता म्हटलं आहे.

2014 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे वक्तव्य जी मी केलं. मी म्हणाली होती की आपल्याकडे दाखवण्यासाठी स्वातंत्र्य असले तरी भारताच्या चेतनेला आणि विवेकाला 2104 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा एक मृत असलेली सभ्यता जिवंत झाली आणि त्या सभ्यतेने पंख पसरले आणि आता ती सभ्यता जोरात गर्जना करत आहे. आज पहिल्यांदा लोक इंग्रजी न बोलता किंवा छोट्या शहरातून आलेले किंवा ‘मेड इन इंडिया’ उत्पादन बनवल्याबद्दल आपला अपमान करू शकत नाही. त्या मुलाखतीत सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. लेकिन जो चोर हैं उनकी तो जलेगी कोई बुझा नहीं सकता। जय हिंद!

Get real time updates directly on you device, subscribe now.