मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

6

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह तिघांना गोरेगाव येथील हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यात किल्ला कोर्टाकडून फरार घोषित करण्यात आले आहे. गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह उर्फ बबलू यांना फरार घोषित करण्यासाठी गेल्या आठवड्यात कोर्टात गुन्हे शाखेकडून अर्ज करण्यात आला होता.

या अर्जावरील सुनावणीदरम्यान, बुधवारी कोर्टाने परमबीर सिंह यांना फरार घोषित केले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे (किल्ला कोर्ट)न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला. पोलीस आयुक्त पद भूषवलेल्या एका अधिकार्‍याला कोर्टाने फरार घोषित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. या आरोपाच्या तपासात त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र वारंवार फोन करूनही तो आला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

त्यावर 26 ऑक्टोबर ही तारीख नोंदवली असून, त्यात ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ठाणे पोलिसांना परमबीर सिंगला अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले आहे. मुंबई पोलीस, महाराष्ट्राची CID आणि NIA परमबीर सिंग यांचा शोधत आहे, पण परमबीर बेपत्ता आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.