मोठी बातमी: बेपत्ता असलेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर

मुंबई: 100 कोटींच्या मनीलॉंद्रीग प्रकरणी अडचणीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे गायब होते. अनिल देशमुख यांना तब्बल 5 वेळा ईडी ने समन्स बजावले होते.अखेर आज ते ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या वर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर याप्रकरणी सीबीआय आणि ईडी ऍक्शन मध्ये आली होती. दरम्यान आज ईडी कडून अनिल देशमुख यांची नुसती चौकशी होणार की त्यांना अटक केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनिल देशमुख यांना यापूर्वी इडी ने अनेक वेळा समन्स बजावले होते. तसेच त्यांच्या वेगवेगळ्या कार्यालयात धाडी पडल्या होत्या. तसेच अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशी देखील करण्यात आली होती. विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने या प्रकरणावरून महाविकास आघाडी वर निशाणा साधला जात होता.

Read Also :