पोलीस उपअधीक्षकामुळे ‘त्या’ महिला वकिलाचा मुंबई मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

7

मुंबई: पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिला वकिलाने मुंबईत मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबजनक घटना घडली आहे. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड येथील वकील महिलेने मुंबईतील मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दौंडचे पोलीस उपअधीक्षक यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा दावा महिला वकिलाने केला आहे. पोलीस अधिकाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करुन देखील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांकडे दाद मागितली तरी देखील न्याय मिळत नसल्याने तिने टोकोचं पाऊल उचललं, अशी माहिती मिळत आहे.

महिलेने मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करत असताना वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.