पुण्यातील तांत्रिक शिक्षणाला मिळणार बळ; ‘ज्ञानदा इन्स्टिट्यूट’ला जागा उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक

5

मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे ‘ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ पायपिंग फ्लो टेक्नॉलॉजी, पुणे’ या संस्थेस शैक्षणिक कार्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे आणि अशा तांत्रिक कौशल्य विकास संस्थांना बळ दिल्यास आपल्या तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, हा आमचा मानस असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. या बैठकीत जागेसंदर्भातील तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘ज्ञानदा इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून पायपिंग आणि फ्लो टेक्नॉलॉजी सारख्या विषयात प्रगत शिक्षण मिळणार असल्याने, औद्योगिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

यावेळी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळे पुण्यातील शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्राच्या विकासाला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.