पुणे येथे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन; अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे. प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेची तयारी करून देत नाहीत, तर त्यांच्यात नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवत असते.अशा संस्थाची व्याप्ती वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पुणे येथे प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले*
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी आयोजित केलेल्या संघलोक सेवा आयोग (UPSC) च्या यशस्वी उमेदवारांचा सत्कार समारंभ.वेळी पाटील बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर मुंबई सहसंचालक रुपेश राऊत,राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई संचालकडॉ. भावना पाटोळे उपस्थित होते
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, UPSC ही केवळ नोकरी मिळवण्याची परीक्षा नाही, तर ती राष्ट्रसेवेच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्याची मोठी संधी आहे. अधिकाऱ्यांनी काम करत असताना सामाजिक परिवर्तन घडवणारे आणि लोकमान्यता मिळवणारे अधिकारी व्हावे. यासाठी प्रशिक्षण शाखांची व्याप्ती वाढवणे आणि दिल्ली येथील प्रशिक्षणार्यांना चांगलीसुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक विचार करत आहे.
संचालक शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, राष्ट्रीय प्रशासन व्यवस्थेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत ५० वर्षांपूर्वी प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते. ही बाब लक्षात घेऊन १९७६ मध्ये राज्य शासनाने SIAC — राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना केली. मुंबईतील शाखांनंतर या शाखांची व्याप्ती वाढवण्यात आली आणि १९८४ मध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे केंद्र सुरू करण्यात आले. पुढे २०१३ मध्ये नाशिक आणि अमरावती येथेही केंद्रे स्थापन करण्यात आली.SIAC हे केवळ संस्था नसून महाराष्ट्राच्या प्रशासकीय आकांक्षांचे प्रतीक आहे. ती प्रत्येक विद्यार्थ्याला देशसेवेसाठी तयार करते.