जाऊ तिथे खाऊ हे या भ्रष्टाचारी सरकारचं धोरण; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

7

मुंबई: राज्यातले जे विविध घटक आहे त्या घटकांच्या संदर्भात सरकार उदासीन आहे. वीज कनेक्शन कापण्याचं काम सुरू आहे. सरकार म्हणतं आम्ही अडचणीत मग शेतकरी, सामान्य माणसं काय सुखात आहेत का? ती तर जास्त अडचणीत आहेत. या सरकारमध्ये एकच काम चाललं आहे ते म्हणजे जाऊ तिथे खाऊ. अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.एकावृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने 10 हजार मृत्यू माझ्यामुळे जाहीर केले. हे कोव्हिड मृत्यू नाहीत असं नोंदवण्यात आलं होतं. कोव्हिड प्रोटोकॉलच्या विरोधात जाऊन या सरकारने एक कॉलम तयार केला होता. अन्य कारणाने झालेले मृत्यू. असं काही कारणच नाही जे मृत्यू लपवले होते त्यांना कोव्हिड झाला होता. मृत्यू लपवण्यात आले होते मी आवाज उठवल्याने त्यांना ते जाहीर करावे लागले असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

माझं म्हणणं हे आहे की कोव्हिड मृत्यू जर लपवले तरीही एकूण मृत्यूंमध्ये ते असले पाहिजेत. सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. अकरा हजारांनी मृत्यू मुंबईत जास्त झाले होते. पटापट लोक रस्त्यावर मेले ते आम्ही पाहिले. या सरकारने लपवूनही हे बाहेर निघालं. तर हे सरकार यावर उत्तर का देत नाही?जे राज्य सर्वाधिक समृद्ध राज्य म्हणून ओळखलं जातं. या सरकारने कोव्हिडच्या संदर्भात स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे मग देशातल्या एकूण मृत्यूंपैकी महाराष्ट्रात 35 टक्के मृत्यू का झाले याचं उत्तर हे सरकार का देत नाही? असाही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.