उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरगरीबांच्या मुलांचं काहीच पडलेलं नाही. त्यांना फक्त आपल्याच मुलाची काळजी आहे. त्यांनी आपल्या मुलाला मंत्री केलं. आमच्या गरिबांच्या लेकराचं काय?, असा सवाल भाजप नेते, आमदार राम सातपुते यांनी केला आहे. राम सातपुते यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना हा सवाल केला आहे.
महाराष्ट्र सरकारला गोरगरीब मुलांचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला मंत्री केलं. पण गोरगरिबांच्या मुलांच्या नोकरीची काळजी त्यांना नाही. गोरगरिबांच्या चुलीत पाणी टाकायचं ही राज्य सरकारची भूमिका आहे, असं राम सातपुते यांनी सांगितलं. स्वत:च्या मुलाला मुख्यमंत्र्यांनी मंत्री केल तर मग आमच्या गरिबांच्या लेकरांच काय?, असा सवालही त्यांनी केला.
तरुणांच्या पिढ्या बरबाद करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे. या पेपरफुटी प्रकरणातील दलाल हे सरकारचे दलाल आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचं निलंबन केलं पाहिजे. चौकशी केली पाहिजे. भरतीमध्येही वाझे वसुली करणार हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. चांगलं केलं की आम्ही केलं. वाईट झालं की केंद्रान केलं. आर्मी इंटेलिजन्सचा अभिनंदन करण्याचा प्रस्ताव ठेवावा, असंही ते म्हणाले.