सीडीएस बिपीन रावत यांना अखेरची मानवंदना; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

41

मुंबई: देशाचे संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीतील ब्रार स्क्वायर या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे. दोन दिवसांपुर्वी तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये झालेल्या हेलीकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील कँटॉनमेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बिपीन रावत यांना तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी मानवंदना वाहिली आहे. तसेच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील मानवंदना वाहिली आहे. बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी अग्नी दिला.

तामिळनाडूतील एका सैनिकी शाळेत नियोजित कार्यक्रमास जाताना सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. सर्वच मृतांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले आहे. शुक्रवारी सीडीएस बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार कऱण्यात येत आहे. रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव दिल्लीतील कँटॉनमेंट येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

सीडीएस बिपीन रावत यांना देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कँटॉनमेंटमध्ये श्रद्धांजली वाहिली. देशासह अन्य देशातील सैन्य अधिकारी बिपीन रावत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. रावत यांना तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या दोन मुली आणि घरातील व्यक्ती रावत यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचल्या होत्या. पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही दिल्लीतील ब्रार स्क्वायर या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.