23 वर्षांचा आहे, माझं वय 25 होईपर्यंत त्यांचं काहीच ठेवत नाही; सर्वपक्षीय पॅनेलविरोधात रोहित पाटीलने थोपटले दंड

13

सांगली: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर आबा अर्थात आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत. सांगली जिल्ह्यात रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रचार करत आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील विरोधात महाविकास आघाडी असं चित्र आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत. खासदार संजय काका पाटील (भाजप), घोरपडे (शिवसेना), सगरे गट (राष्ट्रवादी) आणि गजानन कोठावळे गट असे सर्व जण एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण केली आहे.

कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीची प्रचार सभा होती. यावेळी रोहितच्या भाषणाआधी पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणाले, की 25 वर्षांच्या तरुणा विरोधात सगळे एकत्र आले आहेत. यावर रोहितने उत्तर दिले की “राष्ट्रवादी पक्ष आणि आबांचं कुटुंबीय हे या तालुक्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले घटक आहेत. सगळे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात असा भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. माने सर, आपण सांगितलं की 25 वर्षांच्या तरुणाला हरवायला सगळे जण एकत्र आले आहेत. माझं वय 23 आहे. 25 होईपर्यंत काही शिल्लक ठेवत नाही”

रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे पॅनल लागले आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी ही निवडणूक लागली आहे. येत्या 23 तारखेला मतदान पार पडणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.