नगरपंचायत निकालानंतर तुम्हाला आबा आठवल्याशिवाय राहणार नाही – रोहित पाटील

अहमदनगर: राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यामध्ये निवडणुकींच्या घडामोडींना वेग आला आहे. परंतु महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी प्रचार सांगता सभेत तुफान फटकेबाजी केली आहे. तसेच नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आबा म्हणजेच आर.आर. पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. असं वक्तव्य रोहित पाटील यांनी केलं आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधकांनाही रोहित पाटलांनी आव्हान केलं आहे. अनेक लोकं मला म्हणतात की, तुम्ही आमच्या मनातलं पॅनेल उभं केलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येथील सर्व सामान्यांनी खांद्यावर घेतलेलं आहे. ही निवडणूक सर्व सामान्य माणसाने त्यांच्या हातात घेतलेली आहे. याचा निकाल १९ तारखेला आल्यानंतरच माझ्या आबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे.

आजच्या नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा सांगता सभेमध्ये मनोगत व्यक्त केले. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून केलेलं काम लोकांसमोर ठेवलं आणि पुढे काय करणार आहोत हे देखील सांगितले. मला विश्वास आहे ह्या भागातील सुज्ञ जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन विजयी करेल. असं रोहित पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, कर्जत नगर पंचायत निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे १७ पैकी १७ उमेदवार विजयी होतील. असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!