भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून रोहित पाटलांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या….

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. रोहित पाटील यांनी कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत यश प्राप्त करत विरोधकांचा धुरळा उडवला आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अशातच भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या देखील स्वतः ला रोखू शकल्या नाहीत, त्यांनी ट्विट करत रोहितचे तोंडभरून कौतुक केले आहे.

रोहित पाटील यांच्या विजयामुळे चित्रा वाघ यांनी रोहित पाटील यांचे कौतुक केले आहे. ट्विटर वरती त्यांनी भावनिक पोस्ट करत त्यांचे अभिनंदन देखील केले आहे. त्यांनी लिहिले की, “रोहीत तुझे खूप अभिनंदन… कोणते पद असो की नसो, आबांची नाळ जनतेशी कायम जोडलेली असायची. आबांच्या पावलांवर पाऊल टाकत तू हा जनसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवला. त्याचे फळ तुला आज मिळाले. हे यश तुझे आहे, आज आबा असते तर त्यांना तुझा अभिमान वाटला असता.”

चित्रा वाघ यांनी केलेल्या अभिनंदनानंतर रोहित पाटील यांनी चित्रा वाघ यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषणं करत विरोधकांना नामोहरण केलं होतं. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला १०, तर शेतकरी विकास पॅनलला ६ तर अपक्ष ६ जागांवर विजयी झाले आहेत.