पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला अटक

2

पुणे: आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी झाल्याच्या प्रकरणी यापूर्वीच बीड जिल्ह्यात कारवाई झालेली आहे आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले संजय सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या पेपर कुठे प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संजय सानप याचा मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावले असल्याचेही बोलले जात आहे. म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत आहेत. म्हाडा पेपरफुटीवरून  हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यामुळे भविष्यात  आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे  पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले होते.

दरम्यान, महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सुपेच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती आहे. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीने सुपेच्या पत्नी आणि मेहुण्याने रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागला.

Get real time updates directly on you device, subscribe now.