लोणावळ्यात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ प्रचारार्थ सायकल रॅली

लोणावळा: स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत लोणावळा येथे आज (दि.30) गुरुवार रोजी नगरपरिषदेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायकल रॅलीमध्ये यावेळी तीन गट पाडण्यात आले होते. खुला गट वर्षे १८ महिला तर दुसरा गट पुरुष, तसेच अठरा वर्षांच्याखाली मुले आणि मुंलीचा गट पाडण्यात आला होता. स्वच्छ सर्वेक्षण ब्रँड अॅम्बेसेडर सायकल रॅली प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री आयेशा जुल्का व मराठी अभिनेता सिद्धाध जाधव, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,उद्योजक सतीश मोतलिंग हे उपस्थीत होते.

स्वच्छता अभियानासह स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियानाची लोकचळवळ गतिमान झाली असून, स्वच्छ सर्वेक्षण अभियानमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पुन्हा लोणावळा नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचा मानस नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त करत मोहिमेचा प्रारंभ केला. नगरपरिषदेच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता अभियान मोहिमेला सहकार्य करावे. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी असल्याने प्रत्येकाने स्वच्छाग्रही व्हा आणि आपले घर, परिसर, गाव व शहर स्वच्छ ठेवा असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केले होते. या आव्हानाला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ अंतर्गत जिंगल्स स्पर्धा, शॉर्ट मूव्हीज स्पर्धा, निबंध, वॉल पेंटिंग, पोस्टर्स, चित्रकला, पथनाट्य, उत्कृष्ट किचन गार्डन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, विजेत्यांना रोख बक्षिस देण्यात येणार आहे.

यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधवने लोणावळा नगरपरिषद आणि नगराध्यक्षांचे अभिनंदन करत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल लोणावळा नगरपरिषदेचे आभार देखील मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!