पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर कांबळे तर कार्याध्यक्ष पदी पालकर, पाचपुते

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पदाधिकाऱ्यांची नियुक्तीची घोषणा केली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी  युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी किशोर हनुमंत कांबळे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच कसबा, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरुड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी अजिंक्य सोमनाथ पालकर यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर वडगावशेरी, हडपसर, शिवाजी नगर, पर्वती विधान सभा मतदार संघाचे प्रभारी मनोज मधुकर पाचपुते यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार  यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवकांच्या विकासात भरीव कार्य करुन पक्ष संघटना मजबूत कराल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.