अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा खोचक टोला
मुंबई: संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्यानंतर नारायण राणेंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. यावेळी नाणेंना आता पुढचं टार्गेट हे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असेल, महाराष्ट्रातील सत्ता असेल असेही सांगितले आहे.
ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.
मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हे ऑटो रिक्षा सरकार आहे. हे जे काही लढत होते, त्यांचं सिम्बॉलही रिक्षाच होतं. त्यामुळे त्यांची जी अवस्था होणार होती तीच झाली. कितीही कारणं सांगितली तरी, तिघांनी मिळून एकत्र येऊन संपूर्ण शक्ती पणाला लावली. तरीही त्यांचा पराजय झाला अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे. राजन तेलींची मेहनत होती, त्यांनी खचून जावू नये, समोरच्या अध्यक्षांचा पराभव झाला आहे. त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे, असेही फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गमधील विजयानंतर भाजप नेते महाविकास आघाडीवर तुटून पडताना दिसून येत आहेत.