मास्क घालण्यावरुन मुनगंटीवारांनी केलं अजित पवारांचे कौतुक, म्हणाले…..

मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मास्क घालण्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केलं आहे. ते मास्क कधीही काढत नाहीत त्यांचे निश्चित कौतुक आहे. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच मास्क घातलाच पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मास्क घालण्याच्या आवाहनावर भाष्य केलं आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मास्क घातलाच पाहिजे पण मी मुलाखत देत असल्यामुळे मास्क काढला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निश्चित कौतुक आहे की, ते मास्क कधीही काढत नाहीत असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत समंजसपणे विचार केला पाहिजे. याचे कारण स्पष्ट आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्या तुम्ही शपथनामामध्ये निश्चित देऊ असे म्हटलं आहे. एसटी कामगारांच्या संमेलनात जाऊन मोठी मोठी भाषणे केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब स्वतः म्हणाले आहेत की, कर्मचाऱ्यांना राज्य आणि केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ मग तुम्ही शपथनामामध्ये लिहिता ते हर्बल वनस्पती घेऊन आणि क्रूझच्या ड्रग्ज पार्टीमध्ये ड्रग्जचे सेवन करुन लिहिता का? अशा प्रसंगात तुम्ही सांगितले यावरची कृती करणं महत्त्वाचे आहे.