खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात; गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार

2

जळगाव: भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे भाजप व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचे वक्तव्य करीत टीका केली. त्यावर महाजन यांनी उत्तर दिले आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलं आहे. त्यामुळे ते वाट्टेल तसं बरळत आहेत, अशा शब्दात महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधत खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी महाजन म्हणाले की, खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे असे उद्योग एकनाथ खडसे यांच्याकडून केले जात आहेत.

गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना खडसे यांच्यावर मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याच्या वक्तव्यावर टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी काल जळगाव येथे उत्तर दिले. आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत दाखवायला हवे, असे प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.