मोठी बातमी! राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार?

6

मुंबई: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शाळा सुरु कराव्यात, अशी आग्रही आणि तीव्र मागणी पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून शाळा सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते.

ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. तसेच येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात असं या प्रस्तावात म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि त्यापासून लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली गेली.

शहर आणि ग्रामीण भागातील पहिली ते 12 वी अशा सर्व शाळांचा उल्लेख प्रस्तावात आहे. तसंच प्री प्रायमरी शिक्षण यांचाही विचार केला आहे. तेथील स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे. करोनाच्या सर्व नियमांचं पालन करुनच शाळा सुरु करायच्या आहेत. त्यांना सर्व नियोजन करावं लागणार आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे हेच मुख्य लक्ष्य आहे,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा याकडे लक्ष दिवं जावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता चिमुकल्यांचं लसीकरण होण अत्यंत गरजेचं आहे. अशातच शाळेतील मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. अखेर याबाबत आता पुन्हा हालचालींना आला असून शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. संपूर्ण खबरदारी घेत शालेय मुलांचं कोणतंही नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण मंत्र्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून शाळा सुरु होतात का, याकडे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचंही लक्ष लागलंय.

Get real time updates directly on you device, subscribe now.