उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील अतिशय चुरशीच्या लढाईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी अखेर मारली बाजी

8
मुंबई : लोकसभा निवडणुकीत आज कमालीची चुरस पाहायला मिळाली. सर्वांचे लक्ष आज लोकसभा निवडणुकीच्या निकालावर होतं. मुंबईत सहा मतदारसंघात अटीतटीची लढत होती. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार मुंबईतील लोकसभेच्या जागेत पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहते. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होती. या दोघांमध्येही सुरुवातीपासून चढाओढ पाहायला मिळाली. पण वर्षा गायकवाड यांनी अखेर बाजी मारली.
 
मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा प्रथम काही वेळासाठी वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. पण नंतर बराच काळ भाजपाचे उज्ज्वल निकम ५६ हजार मताधिक्यापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नक्की कोण बाजी मारणार अशी चर्चा रंगू लागली. परंतु शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली आणि आपला विजय निश्चित केला.

 

मुंबईत ६ पैकी ५ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल यांचा विजय झाला आहे. उत्तर मुंबईची जागा वगळता मुंबईतील इत्तर सर्व जागा महाविकास आघाडीने मिळवल्या आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.