मोठी बातमी: दहावी, बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन

6

मुंबई: राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या होत्या तर अनेक रद्द केल्या, मात्र दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. यासाठी राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात मत जाणून घेण्यात एक बैठक पार पडली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली, मात्र कोरोनास्थिती अशीच राहिली किंवा तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्यास दहावी, बारीवीच्या परीक्षांत काही बदल करता येईल का? लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्यासाठी कोणकोणत्या खबरदारी घ्याव्या लागतील?

अथवा त्यासाठी वेगळे पर्याय देता येतील?अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शाळा अंतर्गत मूल्यमापनासाठी सज्ज असतील. यासाठी नियोजन कसा करता येईल य़ावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्य़ेमुळे मागील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या निकालातून गुणांची टक्केवारी वाढली तरी प्रत्यक्ष गुणवत्ते संदर्भात प्रश्नचिन्हा उपस्थित होऊ लागल्याने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या अशी मागणी शिक्षक आणि शाळा, महाविद्यालय संस्थाचालकांच्या प्रतिनिधीनींनी केली.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.