पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार – मुरलीधर मोहोळ
पुणे: कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या करोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरारीतल सर्व शाळा व महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात सोमवार पासून सर्व शाळा सुरु होणार आहेत. मात्र शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला होता.
पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे. पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.